Pimpri corona Update : शहरात आज 98 नवीन रुग्णांची नोंद, 60 जणांना डिस्चार्ज; 3 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 87 आणि महापालिका हद्दीबाहेरील 11 अशा 98 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 60 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महापालिका हद्दीतील एक आणि हद्दीबाहेरील दोन अअशा तिघांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये पिंपरीतील 73 वर्षीय पुरुष, बालेवाडीतील ( 65 वर्षीय पुरुष, खेड येथील 62 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 98 हजार 948 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 95 हजार 623 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1787 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 747 अशा 2534 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 649 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 2646 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.