Pimpri Corona Update: रुग्णसंख्येत मोठी घट! शहरात आज नवीन 404 रुग्णांची नोंद; 928 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पाच हजारावर गेलेली रुग्णसंख्या कमी होत आहे. शहराच्या विविध भागातील 404 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त  झालेल्या 928 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीमधील चार रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 593 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 54 हजार 974 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 7 हजार 81 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 6 हजार 825 रुग्ण गृहविलगीकरणात असून 256 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 78 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 924 आहेत. आज दिवसभरात 7 हजार 131 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 33 लाख 20 हजार 623 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.