Pimpri Corona Update: मोठी रुग्णवाढ – शहरात आज 208 नवीन रुग्णांची नोंद, 106 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Pimpri Corona Update) शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येतील वाढ सुरुच आहे. शहराच्या विविध भागातील 208 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 106 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 61 हजार 899 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1 हजार 26 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 995 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

PCMC : महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी 3 जुलैपर्यंत मुदतवाढ

तर,31 रुग्ण महापालिका (Pimpri Corona Update) रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 1 हजार 822 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 36 लाख 49 हजार 811 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.