State Cabinet Meeting : पुण्याचे नाव जिजाऊ नगर करण्याची काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव बुधवारी शिवसेने अचानकपणे राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत (State Cabinet Meeting)  आणला. त्यामुळे पुण्याचे नाव बदलून जिजाऊ नगर करावे, अशी करण्यात आली. राज्य सरकारमधील शिवसेनेकडून ही मागणी विशेषत: करण्यात येत होती.राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर औरंगाबादच्या नामांतराच्या प्रश्नावरुन भाजपकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या करारात याचा उल्लेख नसल्याने नामांतराचा विषय लांबणीवर पडला होता.

 

शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार (State Cabinet Meeting)  धोक्यात आलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसशी हातमिळवणी केल्याने शिवसेनेचे नेते परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंगळवारी रात्री औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करावे, असा प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीसमोर ठेवला होता. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होती की काय अशी स्थिती आहे.

 

Vijay Shivatare : संजय राऊत यांनीच शिवसेना संपवली; विजय शिवतारे यांचा गंभीर आरोप

 

औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत (State Cabinet Meeting)  आल्यानंतर या बैठकीत काँग्रेसने पुण्याचे नामकरण जिजाऊ नगर ठेवावे अशी मागणी केली. यापुर्वी देखील पुण्याचे नाव बदलून राजमाता जिजाऊ यांचे नाव द्यावे अशी मागणी विविध संघटनांकडून वारंवार केली जात होती. शिवसेनेकडून औरंगाबादचा विषय समोर आल्यानंतर काँग्रेसने हीच वेळ साधत पुण्याच्या नामकरणाची मागणी मंत्रीमंडळात केली.

 

 

 

 

Maharashtra state cabinet approves the renaming of Aurangabad to Sambhaji Nagar and Osmanabad to Dharashiv. Navi Mumbai Airport’s name will be changed to DB Patil International Airport.

 

 

 

 

कालच्या बैठकीत अनिल परब यांनी आजच्या बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या मागणीवर ठराव संमती करण्याची मागणी केली.त्याशिवाय उस्मानाबादचे ना धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटलांच नाव देण्याचा प्रस्ताव आणण्यात येणार असल्याचं सांगितले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.