Pimpri Corona Update: रुग्णसंख्या शंभरच्या आत; शहरात आज 85 नवीन रुग्णांची नोंद

89 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या शंभरच्या आत आली आहे. शहराच्या विविध भागातील 85 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 89 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरात आजमितीला एकूण 946 सक्रिय रुग्ण आहेत.

शहरातील 2 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 4 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 378 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 67 हजार 253 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 946 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 262 रुग्ण गृहविलगीकरणात असून 684 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 43 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 443 आहेत. आज दिवसभरात 17 हजार 204 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 12 लाख 45 हजार 71 जणांनी लस घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.