Pimpri corona Update : शहरात आज 372 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 370 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 372 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली आहे. सर्वच क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण असून ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 72 नवीन रुग्ण सापडले आहेत.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 330 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. चिंचवड येथील 71, 75 वर्षीय दोन पुरुष, वाल्हेकरवाडी येथील 51 वर्षीय पुरुष आणि पिंपरीतील 90 वर्षीय महिला अशा चार रुग्णाचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 5281 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 73 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1841 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 772 अशा 2613 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 831 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1185 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 22 हजार 826 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.