Pimpri Crime : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालाय हद्दीत कर्नकर्कश आवाज करत बुलेट चालवणाऱ्या तिघांवर कारवाई

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड पोलिस (Pimpri Crime) आयुक्तालय हद्दीत काल तीन कर्नकर्कश आवाज करणाऱ्या मोटर सायकलवर कारवाई करण्यात आली. रस्त्यावर धोकादायक, बेजबाबदारपणे गाडी चालविल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

शुभम चांदने (वय 19 वर्षे आंबेठाण चौक, तालुका खेड) आणि शंकर मुंगसे (वय 55 वर्षे, रा. रासे) या दोघानवर कारवाई करण्यात आली आहे. हे दोघांनीही 28 जूनला दुपारी बुलेट कुरुळी गावच्या हद्दीत, स्पीसर चौक, पुणे – नाशिक हायवेवर पुणे बाजूकडून चाकणकडे चालवली. या दरम्यान त्यांनी सार्वजनिक रस्त्यावरून बेदरकारपणे, हयगयीने रोडवरून वाहन चालवत धोकादायकरित्या व कर्नकर्कश करत वाहन चालवले. बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून सामान्य लोकांना उपद्रव/त्रास होईल असा आवाज काढला म्हणून चाकणमध्ये (म्हाळुंगे चौकी) त्यांच्यावर भा. द. वि. कलम 279, 290 अधिनियम 1988 चे कलम 52, 198 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vehicles Act : खासगी गाड्यांवर पोलीस, प्रेस, डॉक्टर, वकील लिहिणे बेकायदेशीर आहे; तुम्हाला माहीत आहे का?

तसेच, माणिक पवार (वय 21 वर्षे, रा. वडमुखवाडी) हा दुदुळगाव जकात नाका येथे रॉयल इंफील्ड स्टॅंडर्ड बुलेट चालवताना सार्वजनिक रोडवर कर्नकर्कश गाडीचा आवाज काढून लोकांना त्रास देत प्रवास करत होता. म्हणून त्याच्या विरोधात दिघी पोलिस ठाण्यात भा. द. वि. कलम 279, 290 अधिनियम 1988 चे कलम 52, 198 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी (Pimpri Crime) पवार याला सी. आर. पी. सी. 41(1) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.