Pimpri : घरगुती कारणावरून सुनेने घेतला सासूच्या हाताला चावा

एमपीसी न्यूज – कामानिमित्त सुनेच्या माहेरी गेलेल्या सासूला शिवीगाळ करत सुनेने हाताला चावा घेऊन जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. ८) रात्री साडेआठच्या सुमारास मोहननगर चिंचवड येथे घडली. याबाबत मुलाने गुन्हा नोंदवला. त्याच्या विरोधात पत्नीने देखील पती आणि सासू विरोधात गुन्हा नोंदवला.

नितीन रमेश निमराण (वय 34, रा. कुसगाव, लोणावळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शीतल नितीन नीमराणा (वय 34), आशा अविनाश भोसले (वय 58, रा. मोहननगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन आणि त्याची आई घरगुती कामानिमित्त नितीनच्या सासरी मोहननगर चिंचवड येथे गेले. त्यावेळी नितीनच्या पत्नीने घरी आलेल्या सासूसोबत भांडण केले. तसेच डाव्या हातास चावा घेऊन सासूला जखमी केले. तर सुनेच्या आईने नितीनच्या आईचे डोके भिंतीवर आपटले. यामध्ये नितीनच्या आई जखमी झाल्या. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.