Pimpri : सोहम सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा

एमपीसी न्यूज – सोहम सार्वजनिक ग्रंथालय व दीनदयाळ उपाध्याय माध्यमिक विद्यालय पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तुकाराम रोंगटे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील ‘मराठी भाषा विभाग प्रमुख’ हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे यांनी भूषविले.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने झाली. प्रास्ताविक जगन्नाथ नेरकर (संस्थापक-अध्यक्ष सोहम सार्वजनिक ग्रंथालय) यांनी केले. सूत्रसंचलन संस्थेचे सचिव प्रदीप बोरसे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म सोहळा औद्योगिक तंत्रशिक्षण संस्था यांनी सादर केला.त्याला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे पु ल देशपांडे यांच्या लेखाचे अभिवाचन करण्यात आले. व्ही. एस. बनसोडे, कवी गझलकार, मंगला पाटसकर निवृत्त शिक्षिका व किरण लाखे यांनी सहभाग घेतला.

जगन्नाथ नेरकर यांनी आपल्या मनोगतात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सर्व शाळांना मध्ये १० वी पर्यंत मराठी विषय सक्तीचा केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच रोंगटे व राजन लाखे यांनी मराठी भाषेचा गुण गौरव केला.

यावेळी अशोक मलिक, निकिता घाडगे, ब्राम्हणकर, दिन दयाळ शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी आणि वाचक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. दातार, दीनदयाळ शाळेच्या शिक्षिका यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.