Pimpri : हिंदु कुलभूषण पुरस्कार सिनेकलाकार योगेश सोमण यांना जाहीर

एमपीसी न्यूज – हिंन्दू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने हिंदू स्वाभिमान दिवसानिमित्त ‘हिंदु कुलभूषण २०१९ पुरस्कार’ देण्यात येणार आहे. हा पुरस्कार सिनेकलाकार योगेश सोमण यांना जाहीर झाला आहे.

चिंचवड येथील हुतात्मा चापेकर स्मारक वाचनालय हिरवळ चापेकर चौक येथे शनिवारी (दि. ११ मे) सायंकाळी साडे सहा वाजता होणार आहे. छत्रपती शिवाजीमहाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर याविषयावर योगेश सोमण मार्गदर्शन करणार आहेत.

  • तसेच स्व. प्रा. एकनाथ नाणेकर स्मृती समाज सेवा पुरस्कारचे मानकरी अधिष्ठाता आर्यवीर व्यंकटेश हालिंगे, स्व. संजय आर्य स्मृती युवाजागृती पुरस्काराचे मानकरी सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमंगुडे यांना जाहीर झाला आहे. तर, विशेष पुरस्कारात वीरपत्नी सन्मानात मंगलताई तुळशीराम साळुंके यांना जाहीर झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.