Pimpri: भगवान सेनेच्या अध्यक्षपदी दीपक नागरगोजे

Pimpri: Deepak Nagargoje as the President of Bhagwan Sena भगवान सेनेकडून शहरांमध्ये विविध उपक्रम घेतले जातात ही संस्था सामाजिक कार्यांमध्ये नेहमीच अग्रेसर असते.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहर भगवान सेना कार्यकारणीची नुकतीच बैठक झाली. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते दीपक राजमल नागरगोजे यांची भगवान सेना पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी माजी प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेविका योगिता नागरगोजे, नगरसेवक केशव घोळवे, सुभाष दराडे, ज्ञानेश्वर नागरगोजे, जयप्रकाश दहिफळे, पवन जाधवर राहुल नागरगोजे आदी यावेळी उपस्थित होते.

भगवान सेनेकडून शहरांमध्ये विविध उपक्रम घेतले जातात ही संस्था सामाजिक कार्यांमध्ये नेहमीच अग्रेसर असते. मी गेल्या अनेक वर्षांपासून भगवान सेनेमध्ये काम करतो.

आज अध्यक्षपदावर माझी नेमणूक झाली आहे. मी नक्कीच संघटनेचे काम वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे दीपक नागरगोजे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.