Pimpri :  शहरातील सर्व नागरिकांना होमिओपॅथिक ‘आर्सेनिक अल्बम 30’ या गोळ्यांचे मोफत वाटप करा  – गजानन बाबर

Distribute Homoeopathic 'Arsenic Album 30' tablets free of cost to all citizens of the city - Gajanan Babar

एमपीसी न्यूज – सर्वसामान्य नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना होमिओपॅथिक ‘आर्सेनिक अल्बम 30’ या गोळ्यांचे मोफत वाटप करावे, अशी विनंती माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पत्राद्वारे केलेल्या विनंतीत बाबर म्हणतात, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर  सर्वसामान्य नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ‘आर्सेनिक अल्बम 30’  या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे नागरिकांना करण्यात यावे.

केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे सुचवण्यात आलेल्या या गोळ्यांचे केरळ, कर्नाटक व इतर  8 राज्यांमध्ये या चांगले परिणाम दिसून आले आहेत. कोरोनावर लस निर्माण करण्यासाठी सर्व जगातील वैज्ञानिक धडपडत आहेत.

अद्याप त्यावर काही औषध उपलब्ध नसल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आपल्या हातात आहे. त्यामुळे पालिकेने याबाबत विचार करून नागरिकांना होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप करावे अशी विनंती बाबर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.