Pimpri: ‘महाराष्ट्र मजदूर संघटने’तर्फे बांधकाम व असंघटीत कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूमुळे प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या परिस्थितीत हातावर पोट असणा-यांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पिंपरी शहरातील काही स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तीदेखील पुढे सरसावल्या आहेत. लाॅकडाऊन मुळे शहरातील सर्व क्षेत्रातील बांधकाम प्रकल्प व इतरही कामे बंद असल्याने हातावर पोट असणारे हे असंघटीत क्षेत्रातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्र मजदूर संघटने’तर्फे   निगडी व चिंचवड परिसरातील मोहननगर परिसरातील कामगार  बांधवांसाठी पीठ, तांदुळ, डाळ, तेल, मीठ, मिरची, मसाले, व आदी जीवनावश्यक साहित्याचे प्रती पाच, दोन, एक किलोप्रमाणे एक-एक  किट तयार करून बांधकाम व असंघटीत क्षेत्रातील कामगारांना या कीटचे वाटप केले.

 

निगडी व मोहननगर परिसरातील जवळपास 200 कामगार  बांधवाना या जीवनावश्यक किटचे वाटप केले.  असंघटीत क्षेत्रातील कामगार  बांधव या मदतीविना दुर्लक्षित राहिले आहेत. समाजातील विशेष घटक म्हणून आज कामगार बांधवाकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्र मजदूर संघटनाही नेहमीच कामगारांच्या करीता कार्यरत असते.  म्हणूनच नेहमीच या असंघटीत बांधवांच्या हिताचा विचार करीत त्यांच्यासाठी झटत असते.

 

यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे  अध्यक्ष इरफान सय्यद, सल्लागार बाळासाहेब शिंदे  कार्याध्यक्ष परेश मोरे, जन. सेक्रेटरी प्रवीण जाधव, राहुल कोल्हटकर, प्रितेश शिंदे , अरूण जोगदंड, अप्पा मुजमले , खंडू गवळी, आप्पा कौदरी, पांडुरंग कदम, सतिश कंटाळे, गोरक्ष दुबाले, राजु तापकीर, सुनिल साळवे, संजय बांदल, प्रभाकर गुरव, बाबासाहेब पोते, तेजस भंडारी,अहिमद शेख,रवि वंजारी  आदींनी परिश्रम घेतले.

शहरातील कामगार, कष्टकरी व  बांधवांवर कोरोनामुळे   आभाळ कोसळले आहे. पिंपरी-चिंचवडमधील महाराष्ट्र मजदूर संघटना या संपूर्ण परिस्थितीशी लढण्याकरिता आणि नागरिकांच्या मदतीकरिता सज्ज आहे. कामगार व कष्टकरी यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, समाजातील विशेष घटक या मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी कामगार बांधवाना या वस्तूंचे किट देण्यात आले. याचाच एक भाग म्हणून लॉकडाऊनच्या काळात कामगार बांधवाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनीदेखील अशा कामी पुढाकार घ्यावा.   इरफान सय्यद  : अध्यक्ष, महाराष्ट्र मजदूर संघटना.  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.