Pimpri: खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून दिव्यांगाना साहित्याचे वाटप

एमपीसी न्यूज – शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारचा दिव्यांग विभाग, सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने मावळ लोकसभा मतदार संघातील दिव्यांग नागरिकांना साहित्याचे वाटप करण्यात आले. 590 दिव्यांगांनी याचा लाभ घेतला असून अडीच हजार लोकांची तपासणी शिबिराचा लाभ घेतला. छोट्या-मोठ्या सायकल, व्हीलचेअर, विकलांगांसाठी कीट, अंधांसाठी इलेक्ट्रॉनिकच्या काट्या, कर्मबधीरांसाठी कानातील मशिन, स्मार्ट अॅप, अॅल्युमिनियमच्या कुबड्या या साहित्याचे वाटप करण्यात आले.

थेरगाव येथील मोरया मंगल कार्यालयात गुरुवारी (दि.7)दिव्यांग नागरिकांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, अधिकारी संजय मंदन, आमदार गौतम चाबुकस्वार, संपर्कप्रमुख बाळा कदम, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, महिला संपर्कप्रमुख वैशाली सूर्यवंशी, महिला जिल्हा संघटिका शादान चौधरी, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला शहरसंघटिका उर्मिला काळभोर, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे, युवसेना विस्तारक वैभव थोरात, पिंपरी विधानसभा संघटक, नगरसेवक प्रमोद कुटे, निलेश बारणे, चिंचवड विधानसभा संघटक अनंत को-हाळे, कामगार नेते इरफान सय्यद, माजी नगरसेवक किरण मोटे, अनिता तुतारे उपस्थितीत होते. दोन दिवसांपुर्वी पनवेल, कर्जत, मावळ येथील नागरिकांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

  • यावेळी बोलताना खासदार बारणे म्हणाले, ”दिव्यांग व्यक्तींपर्यंत या योजनेचा लाभ मिळावा. यासाठी मी सातत्याने प्रयत्न केला. पाठपुरावा करुन साहित्य मंजुर करुन घेतले. दिव्यांगाना साहित्य मिळाल्यावर त्यांच्या चेह-यावरील समाधान पाहून अतिशय आनंद झाला. दिव्यांगाना अनंत अडी-अडचणी येतात. हे साहित्य मिळाल्यावर त्यांना फायदा होणार आहे. त्यांच्या चेह-यावर हास्य फुलवू शकलो. त्यांच्यासाठी काम केले, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. मोठ-मोठी विकास कामे करणे हे लोकप्रतिनीधीचे काम आहेच. परंतु, दिव्यांगाकडे लक्ष केंद्रित ठेऊन त्यांना लाभ मिळवून देणे देखील आवश्यक आणि अतिशय महत्वाचे कार्य आहे”.

”केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या माध्यमातून ही योजना राबविली जात होती. दिव्यांग लाभ धारकाची यादी पाठवून मंजुर करुन घेतली होती. पनवेल, कर्जत, मावळ आणि पिंपरी-चिंचवड शहरातील दिव्यांग व्यक्तीना मदत मिळण्यासाठी तपासणी कॅम्प आयोजित केले होते. या तपासणी कॅम्पमध्ये जवळपास अडीच हजार दिव्यांग व्यक्तींनी सहभाग घेतला. त्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणी कॅम्प मधून पात्र झालेल्या एकूण 590 व्यक्तींना मदत साहित्य वाटप करण्यात आल्याचे, खासदार बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकातून सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.