Pimpri: ट्यूमरची शस्त्रक्रिया यशस्वी करणा-या डॉक्टरांचा सत्कार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृति रूग्णालयात दाखल झालेल्या रुग्ण महिलेच्या पोटातील साडेतीन किलोंचा डेसमॉइड ट्यूमर शस्त्रक्रिया करुन यशस्वीरित्या काढल्याबद्दल महापालिकेतील डॉक्टरांचा स्थायी समिती सभेत सत्कार करण्यात आला. स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.

अधिष्ठाता डॉ. संजय वाबळे, सर्जन डॉ. संजय पाडाळे, सर्जन डॉ. कांचन वायकोळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक मयूर कलाटे, पंकज भालेकर, राजेंद्र गावडे, संतोष लोंढे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त अजित पवार उपस्थित होते.

तळवडे येथील 26 वर्षीय महिलेच्या पोटातील साडेतीन किलोचा डेसमॉइड ट्यूमर शस्त्रक्रिया करून यशस्वीरित्या काढला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.