Pimpri : पुणे मेट्रोच्या वल्लभनगर स्थानकावर प्रथमच ‘लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन’

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोचे काम पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात सुरु आहे. पिंपरी-चिंचवड मधील वल्लभनगर मेट्रो स्थानकाचे काम पूर्णत्वास आले असले तरी सेवा अद्याप सुरु झाली नाही. त्यापूर्वीच मेट्रो बॉलिवूडचे आकर्षण बनली आहे.

वल्लभनगर मेट्रो स्थानकावर चित्रिकरण सुरु असून पुणे मेट्रो थेट चित्रपट सृष्टीच्या आकर्षणास पात्र ठरली आहे. ते ठराविक कालावधीसाठी चित्रिकरणासाठी देण्यात आले आहे. या चित्रिकरणासाठी प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान आला असल्याची परिसरात चर्चा आहे.

रविवारी (दि. 5) दुपारी मेट्रो स्थानकावर चित्रिकरण करण्यात आले. दरम्यान स्थानकाजवळ बॉलिवूडच्या किंग खानला पाहण्यासाठी काही चाहते रेंगाळत होते. मेट्रो स्थानक चित्रिकरणासाठी दिले असल्याने मेट्रोचे ठराविक अधिकारी, कर्मचारी वगळता अन्य अधिकारी, कर्मचा-यांना देखील स्थानकावर जाण्यास मनाई आहे.

मेट्रो स्थानकावर चित्रिकरण सुरु असून त्याची गुप्तता पाळली जात आहे. याबाबत अधिक माहिती नाही नसल्याचे मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे यांनी सांगितले

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.