Pimpri : स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय लांडे यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय नारायण लांडे यांचे (Pimpri ) ह्रदयविकारच्या तीव्र धक्याने आज (सोमवारी) सकाळी निधन झाले. त्यांचे वय 68 होते.

दत्तात्रय लांडे हे 1992 मध्ये पिंपरी महापालिकेवर अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्यासोबत विलास लांडे हे देखील अपक्ष म्हणून निवडून आले होते. या दोघांनी काँग्रेसला पाठींबा दिला होता. जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेत पाठींबा जाहीर केला होता. त्यानंतर दत्तात्रय लांडे यांना 1992-93 मध्ये स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले होते.

Navratri Special : स्त्रीशक्तीला प्रेरणा, हेच संगीताताईंचं कार्य

मागील काही दिवसांपूर्वी त्यांची बायपास झाली होती. त्यातून ते बरेही झाले होते. पण,पुन्हा प्रकृती खालावली. सोमवारी त्यांना (Pimpri) ह्रदयविकारच्या तीव्र धक्का बसला. त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचे चुलते तर महापालिकेचे निवृत्त लेखापरीक्षक रामदास लांडे यांचे ते बंधू होत.

दत्तात्रय लांडे यांच्या पार्थिवावर भोसरीतील स्मशानभूमीत दुपारी दीड वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.