_MPC_DIR_MPU_III

Pimpri : चाबुकस्वार यांच्या पदयात्रेत दोन खासदारांचा उत्स्फूर्त सहभाग

एमपीसी न्यूज- पिंपरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारार्थ मोहननगर, काळभोरनगर परिसरात भव्य पदयात्रा गुरुवारी (दि. 17) काढण्यात आली. खासदार श्रीरंग बारणे व अमर साबळे या पदयात्रेत सहभागी झाल्याने नागरिकांचा सहभाग व महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष यावेळी दिसून आला.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

काळभोरनगर येथील सेना कार्यालयापासून या पदयात्रेला सुरूवात झाली. शहरप्रमुख योगेश बाबर, नगरसेवक प्रमोद कुटे, मिनल यादव, अनुराधा गोरखे, अमित गोरखे, राजू दुर्गे, उर्मिला काळभोर, विजय गुप्ता, गणेश लंगोटे, जयश्री वाघमारे, नारायण बहिरवाडे, भीमा बोबडे, मधुकर बाबर, बाळा शिंदे, राजेश फलके, नाना काळभोर यांच्यासह शेकडो महायुतीचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते.

काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, विद्यानगर, दत्तनगर आदी भागात या पदयात्रेने मार्गक्रमण केले. वाजंत्री, हलगी यांच्या तालासुरात निघालेल्या या पदयात्रेला रस्त्यात ठिकठिकाणी प्रचंड प्रतिसाद लाभला. महिलांनी औक्षण करून स्वागत केले तर स्थानिक कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आमदारांचे स्वागत केले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.