_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु, लहूजी वस्ताद साळवे यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरु आणि क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त महापालिका भवनातील प्रतिमेस महापौर राहुल जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्याचप्रमाणे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्याही पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

नेहरूनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्यास महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, माजी महापौर हनुमंतराव भोसले, नगरसदस्य राहुल भोसले, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रभारी जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते अनिल यादव, माउली इंगळे, सोनू तरटे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.