Pimpri : हिमोफिलियाचा प्रश्न विधिमंडळात मांडणार –  आमदार उमा खापरे

एमपीसी न्यूज –  हिमोफिलिया रुग्णांचा (Pimpri)  प्रश्न अत्यंत गंभीर आहे. विशेषतः बीड, लातूर, धाराशीव, सोलापूर येथील रुग्णांना पुरेशा औषधाअभावी अतोनात त्रास सहन करावा लागतो. या रुग्णांचे प्रश्न विधिमंडळात लक्षवेधी सुचना मांडून त्याद्वारे त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे आमदार उमा खापरे यांनी सांगितले.

डॉ. डी वाय. पाटील मेडिकल कॉलेज येथे ‘जागतिक हिमोफिलिया दिन’ उत्साहात साजरा झाला.  रशिद लीलानी, विजय चोरडिया, रामू गडकर, डॉ. शैलजा माने,  डॉ. सुनिल लोहाडे, डॉ. राऊत, डॉ. ठाकरे उपस्थित होते.

Pune : अभिनेते किरण माने यांना पंधरावा ‘सम्यक पुरस्कार’ जाहीर

तत्पूर्वी, या कार्यक्रमात रामु गडकर आणि रशिद लीलानी यांनी हिमोफिलिया रुग्णांची गंभीर परिस्थिती आमदार उमा खापरे यांच्यापुढे मांडली. हिमोफिलिया हा आनुवंशिकरित्या होणारा रक्तदोष असून यात रुग्णांना रक्त न गोठणे, सांध्यांना सूज येणे असा त्रास होतो. औषधांअभावी रक्तप्रवाह न थांबल्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असते या कार्यक्रमात पश्चिम महाराष्ट्रातून जवळपास 150-200 लोक उपस्थित होते.

उपस्थितांपैकी बीड, सोलापूर येथील रुग्णांनी उमा खापरे यांच्यापुढे आपल्या व्यथा मांडल्या. कार्यक्रमाची सुरुवात ऋषी डांगे व व्योम कुलकर्णी यांच्या सुरेल वादनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता भोसले यांनी केले व आभारप्रदर्शन डॉ. राऊत (Pimpri)  यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.