Pimpri: फायर ब्रिगेडमध्ये वाहने आणि उपकरणे दुरूस्तीसाठी नेमणार मानधनावर कर्मचारी!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका (फायर ब्रिगेड) अग्निशामक दलामध्ये वाहने आणि उपकरणे दुरूस्ती करण्यासाठी तांत्रिक कर्मचा-यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना एकत्रित मानधन दिले जाणार आहे.

अग्निशामक विभाग हा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अत्यावश्यक सेवेचा महत्वाचा आणि अत्यंत संवेदनक्षम विभाग आहे. ज्यासाठी अत्यंत अनुभवी असे तांत्रिक कर्मचा-यांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे अग्निशामक दलाची वाहने आग व अन्य बचाव घटनेच्या ठिकाणी रात्री-बेरात्री, कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी काही कारणास्तव वाहने ना दुरूस्त विंâवा तांत्रिक बिघाड होतात. अशावेळी 24 तास प्रत्येक अग्निशामक केंद्रामध्ये तांत्रिक, तसेच फिटर कर्मचा-यांची आवश्यकता असते.

_MPC_DIR_MPU_II

नियमित देखभाल, दुरूस्ती आणि अवेळी घटनास्थळी वाहने किंवा उपकरणे बंद पडल्यास त्या जागेवरील तातडीची कामे करण्यासाठी अग्निशामक दलामध्ये तांत्रिक कर्मचा-यांची गरज भासते. त्यातही अग्निशामक विभागाचे कामकाज तांत्रिक स्वरूपाचे आणि तीन पाळ्यांमध्ये 24 तास काम चालते. त्यामुळे अग्निशामक वाहनांच्या कामकाजाची गरज लक्षात घेता अग्निशामक दलासाठी विविध तांत्रिक कर्मचा-यांची नेमणूक करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशामक विभागातर्फे घेण्यात आला आहे.

त्यामध्ये दोन पंप मॅकेनिक, तीन मोटार मॅकेनिक आणि एक कनिष्ठ अभियंता यांची नेमणूक सहा महिन्याच्या कालावधीसाठी मानधनावर करण्यात आहे. कनिष्ठ अभियंता पदासाठी संवर्ग नाही. मात्र, पंप मॅकेनिक पदासाठी एक खुला व एक अनुसुचित जाती पदासाठी राखीव आहे, तर मोटार मॅकेनिकमधील एक खुला, एक इतर मागासवर्गीय आणि एक अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. पंप मॅकेनिक आणि मोटार मॅकेनिक यांना दरमहा 15 हजार रुपये, तर कनिष्ठ अभियंता यांना 20 हजार रुपये दरमहा मानधन देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.