Chinchwad : बनावट दाखला दिल्याप्रकरणी दुकाने निरीक्षकासह पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – दुकान मालकाच्या नावाच्या बदलाबाबत परस्पर बनावट कागदपत्रे सादर करून तसेच तत्कालीन दुकाने निरीक्षक यांच्याशी संगनमत करून दुकानाच्या नावातील बदलाचा बनावट दाखला दिला. याप्रकरणी तत्कालीन दुकाने निरीक्षकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार चिंचवड येथे 11 जून 2017 ते 2 जानेवारी 2020 दरम्यान घडला.

विजया दिलीप मुथा (वय 60), अमित दिलीप मुथा (वय 37), पल्लवी स्वप्नील मुथा (वय 34, सर्व रा. तानाजीनगर, चिंचवड) तसेच उज्ज्वल च. सूर्यवंशी याच्यासह इतर एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सूर्यवंशी हा पुण्यातील शिवाजीनगर येथील तत्कालीन दुकाने निरीक्षक आहेत. याप्रकरणी राजेंद्र शंकरलाल मुथा (वय 58, रा. लिंकरोड, तानाजीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र मुथा यांचे दिलीप प्रोव्हिजन स्टोअर्स नावाचे दुकान असून, या व्यवसायाबाबत दुकान मालकाच्या नावाच्या बदलाबाबतचा दाखला मिळण्यासाठी मूळ जागा मालकाची संमती आवश्यक आहे. मात्र, फिर्यादी यांचे आर्थिक नुकसान करण्याच्या हेतूने त्यांची संमती घेतली नाही. आरोपी यांनी संगनमत करून बेकायदेशीर अनाधिकाराने हक्क, अधिकार मिळविण्याच्या हेतूने बनावट कागदपत्रे तयार केली. ती दुकाने निरीक्षक, पुणे यांच्या कार्यालयात सादर केली. तसेच आरोपी यांनी तत्कालीन दुकाने निरीक्षक असलेला आरोपी सूर्यवंशी याच्याशी संगणमत केले. त्यानंतर तत्कानीन दुकाने निरीक्षक, पुणे यांनी अधिकार नसताना मालकाच्या नावातील बदलाबाबतच्या दाखल्याला परवानगी देऊन फिर्यादी यांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.