Pimpri : पिंपरीत तब्बल सहा लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – पिंपरीत (Pimpri) बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी तब्बल 6 लाख रुपायांची घरफोडी करण्यात आली आहे. ही चोरी शनिवार (दि.28) ते रविवार (दि.29) या कालावधीत पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे घडली आहे.

याप्रकरणी अनिकेत विलास पावळकर (वय 39, रा.पिंपरी) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे एकाला कोयत्याने मारहाण करत लुटले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (Pimpri) यांचे घर बंद असताना चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लाकडी कापाट उचकटून त्यातील सोने-चांदीचे दागिने असा एकूण 5 लाख 98 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.