Pimpri : पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पतीला अटक

एमपीसी न्यूज – पत्नीला विषारी औषध पाजून तसेच तिचा गळा (Pimpri) आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा सारा प्रकार 10 जून रोजी पिंपरी येथे घडला आहे.

याप्रकरणी पीडितेच्या मुलीने वडिलांविरोधात पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे.

Alandi : अलंकापुरीतील ‘त्या’ प्रकरणावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत होता. यावरून त्याने पत्नीला जिवे मारण्यासाठी त्याने रिक्षात घेवून जाऊन, तुला संपवून टाकतो म्हणत विषारी औषध पाजले, गळा आवळून तसेच दगडाने डोक्यात मारून जिव घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली (Pimpri)असून आरोपीला गुंडा विरोधी पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.