Pimpri : ‘त्या’ राडा प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग

एमपीसी न्यूज – पिंपरी येथे नगरसेवक डब्बु आसवाणी आणि सचिन सौदाई गटात झालेल्या राड्यामध्ये परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, तपासाबाबत अनेक वादविवाद समोर येत असल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

पिंपरीतील सलोनी हॉटेलमध्ये २५ एप्रिल रोजी सचिन सौदाई आणि त्याचे साथीदार घुसले. बिलाचे पैसे न दिल्याने वाद झाला. त्यावेळी आसवाणी गट त्याठिकाणी आला. वाद विकोपाला गेल्याने सौदाई व साथीदारांनी आसवाणी व कुटुंबियांना बेदम मारहाण केली.

याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर, निवडणुकीत काम न कल्याने आसवाणी यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी स्थानिक पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.