Pimpri: खराळवाडी, पिंपळेगुरव, तळवडेतील चौघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; रुपीनगर, थेरगावातील दोघे ‘कोरोनामुक्त’

कोरोना बाधितांचा आकडा 164 वर; 65 जण कोरोनामुक्त, सात जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव, खराळवाडी आणि तळवडे येथील सहा महिन्याच्या मुलीसह आणखी चार जणांचे आज (गुरुवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, सकाळी चिंचवड स्टेशन येथील तिघांचे आणि पुण्यातील पण वायसीएममध्ये उपचार सुरु असलेल्या एका महिलेचे अशा चार जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे दिवसभरात आठ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर, रुपीनगर, थेरगावातील दोघे कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, सक्रिय रुग्णांची संख्या 77 झाली आहे. तर, आजपर्यंत शहरातील आणि शहराबाहेरील पण वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशा 164 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 65 जण कोरोनामुक्त झाले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने बुधवारी (दि. 6) 76 कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही आणि ‘नारी’कडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट सायंकाळी आले आहेत. त्यामध्ये पिंपळे गुरव, खराळवाडी, तळवडे येथील चार जणांते रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. 15 वर्षाचा मुलगा, सहा महिन्याची मुलगी, 16 आणि 28 वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर, रुपीनगर, थेरगाव येथील दोघे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांचे 14 दिवसांचे आणि त्यानंतरच्या 24 तासाचे दोनही रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. महापालिका रुग्णालयात 77 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील 62 आणि शहराबाहेरील 3 असे 65 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.

  • आजचा वैद्यकीय अहवाल!
    #दाखल झालेले संशयित रुग्ण – 176
    # पॉझिटीव्ह रुग्ण – 08
    #निगेटीव्ह रुग्ण – 69
    #चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 176
    #रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 263
    #डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 71
    #आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 164
    # सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 77
    # शहरातील कोरोना बाधित नऊ रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु
    # आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 7
    #आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 65
    # दैनंदिन भेट दिलेली घरे – 19889
    #दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 61148

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.