Pimpri : मुंबईचे राजे संघाचा अवघ्या एका गुणाने विजय

एमपीसी न्यूज – दिलजीत चौहान आणि करमबीर सिंग यांनी चांगला खेळ करत इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत मुंबई चे राजे संघाने तेलुगू बुल्स संघावर 34-33 असा अवघ्या एका गुणाने विजय मिळवला. पुण्याच्या बालेवाडी येथे सामने सुरू आहेत.

तेलुगू बुल्स संघाच्या चढाईपटूनी चांगला खेळ करत पहिल्या क्वार्टरमध्ये संघाला 4-1 अशी आघाडी मिळवून दिली. दिलजीतने डु ऑर डाय रेडमध्ये पहिल्या गुणांची कमाई केली. यानंतर विजय राजपूतने चढाईत आणि रवी देसीवाल्स यांनी पकडीत गुण मिळवत मुंबईचे राजे संघाला 4-4 अशी बरोबरी साधून दिली. यानंतर तेलुगू बुल्स संघाने दोन गुणांची कमाई करत पहिल्या क्वॉर्टरमध्ये 9-7 अशी आघाडी घेतली.

  • मुंबईचे राजे संघाने दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये जोरदार पुनरागमन केले. दिलजीतने तीन गुणांची कमाई केली व दरम्यान त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. पण, पुढच्या चढाईत त्याने हरहिंदरला बाद केले.
_PDL_ART_BTF

सुहासला बाद करत मुंबईने पहिल्या ऑल आऊटची नोंद करत 16-11 अशी आघाडी घेतली.त्यामुळे दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये 20-14 अशी आघाडी घेतली. मुंबई चे राजे संघाने शेवटच्या क्वॉर्टरमध्ये जाण्यापूर्वी सहा गुण मिळवत आघाडी 26-20 अशी केली.

  • अंतिम क्वार्टरमध्ये शेवटचे पाच मिनिटे शिल्लक असताना तेलुगू बुल्सने पुनरागमन करत सामना 29-29 असा बरोबरीत आणला. दरम्यान, पंच मुंबईचे राजे संघाला डु ऑर डाय चढाईबद्दल सांगण्यास विसरले. त्यामुळे मुंबईला दोन गुणांचा फटका बसला. त्यामुळे एक मिनिट शिल्लक असताना तेलुगु बुल्स संघाने 32-30 अशी आघाडी घेतली.

करमबीरने संघाला गरज असताना आपल्या चढाईत तीन गुणांची कमाई करत मुंबई चे राजे संघाला 34-32 अशी आघाडी मिळवून दिली.आपल्या शेवटच्या चढाईत तेलुगु बुल्स संघाला अवघ्या एकाच गुणाची कमाई केली. त्यामुळे मुंबईच्या संघाने 34-33 असा विजय मिळवला.

  • सामनावीर : दिलजीत (10 हुन अधिक गुण)
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.