Dr. Shripal Sabnis : खेळाडू कोण्या एका जाती-धर्माचे नसतात

एमपीसी न्यूज – खेळाडूंना जात, धर्म नसतो. खेळाडूवर कोणी हक्क गाजवू शकत नाही. ते विश्वातील प्रत्येकाचे आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस (Dr. Shripal Sabnis) यांनी केले.

कॅम्प येथे रविवारी महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा आणि ग्लोबल फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या बॉक्सिंग स्पर्धेतील खेळाडूंच्या विशेष गौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय युवा बॉक्सिंग स्पर्धेत उत्तुंग कामगिरी केलेल्या आब्बास साबुनी तसेच गौरव गोसावी, सलमान शेख (शिवछत्रपती पुरस्कार विजेते), विजय यादव (शिवछत्रपती पुरस्कार विजेते, इंडियन रेल्वे) यांचा गौरव डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला.

Jansanvad Sabha : जनसंवाद सभेकडे नागरिक फिरवाताहेत पाठ; 89 नागरिकांचा सहभाग

यावेळी प्रमुख पाहुणे अर्जुन पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते कॅप्टन गोपाल देवांग, कवि उद्धव कानडे, सचिन ईटकर, माजी सहायक पोलीस आयुक्त महेंद्र रोकडे, रवींद्र डोमाळे, डॉ. संभाजी मलघे, मोहम्मद अली साबुनी, रेश्मा साबुनी, झुबेर शेख, फिरोझ पंडोल, नाजिरुद्दीन सय्यद आदी उपस्थित होते. यावेळी उद्धव कानडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर महेंद्र रोकडे यांनी आभार (Dr. Shripal Sabnis) मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.