Pimpri : शिवभक्तांच्या सहभागाने कुसूर घाट पदभ्रमण मोहीम फत्ते; मोहिमेदरम्यान लाभला गावकऱ्यांचा पाहुणचार

एमपीसी न्यूज – आज ऐतिहासिक कुसूर घाट पदभ्रमण मोहिम उत्साहात आणि शिवभक्तांच्या मोठ्या सहभागासह पार पडली. या मोहिमेची सुरूवात कुसूर गावातील मंदिरात देवपूजन व छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. मावळ अँडव्हेन्चरचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ जावळीकर यांनी काही सूचना देत त्यांच्या मार्गदर्शनाने सर्वजण कुसूर घाटाकडे रवाना झाले.

कुसूर घाट हा सह्याद्रीत मंग काय जंगल आलच. या जंगलातून जाणाऱ्या घाटवाटेने सर्वजन चालत असता इतिहास संशोधक डॉ.प्रमोद बोऱ्हाडे व जावळीकर यांनी घाट वाटाची माहिती दिली. काही अंतर गेल्यावर घाटमार्गावरील वाघजाई देवीचे ठाण्याजवळ परंपरानुसार नारळ चढवण्यात आला. त्याच ठिकाणी असलेला शिवकालातील दिशादर्शक दगडावरील बाणाची माहिती देण्यात आली.

सर्वजण जंगलातल्या घाटवाटेवरून चालता चालता पक्षांचे आवाजाचा आनंद घेत होते. नियोजित घाटाचे पाच मैलाचे दगडाचे ठिकाणा पर्यंत सर्वजन पोहचले. मैलाच्या दगडांच्या शोधाबाबत व घाटाच्या संवर्धानाचा अनुभव जावळीकर यांनी सर्वांना सांगितला. घाटाबद्दल उपस्थितांकडून प्रश्नोत्तर झाले. परतीच्या मार्गाला लागून सर्वजन अष्टकोणी तलावाजवळ पोहचले. अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला ह्या अष्टकोणी तलावाची माहिती सहभागी शिवभक्तांना दिली.

त्यानंतर सर्वजण मंदिरात पोहचले. मंदिरात इतिहास संशोधक डॉक्टर प्रमोद बो-हाडे सर यांनी “सह्याद्रितील घाटवाटा व किल्ले” या वर व्याख्यान देत प्राचीन काळापासून घाटवाटांचा उपयोग, इतिहास, वापर, क्रांतिकार यांनी घाटाचा कसा वापर केला? इथपर्यंत माहिती दिली. उपस्थित पाहुण्यांचा सन्मान झाला. काही टप्प्यात घाटवाटेची पाऊस व भूस्खलनामुळे खूपच वाईट परिस्थिती झाली आहे. त्यामुळे उपस्थित सर्वांना कुसूर घाट पुरुरुजीवनाकरीता या पुढे जमेल तशी मदत करण्याचा शब्द दिला.

क्रार्यक्रम संपल्यानंतर मोहिमे करीता उपस्थितांना कुसूर गावातील ग्रामस्थांनी भोजनाची व्यवस्था केली होती. सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला व मोहिमेची सांगता झाली. घाटवाटा बद्दल माहिती व्हावी, म्हणून पहिल्यांदाच अशा पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले होते. यातुन घाटवाटांचे इतिहासात किती मोठे स्थान आहे हे आज समजले.

यावेळी कला, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य जाधवर, डॉ.प्रमोद बोऱ्हाडे, सुभाष आलम, अशोक आडकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.