Pimpri : आमदार महेश लांडगे यांच्या विकास निधीतून नेहरुनगर, अजमेरा कॉलनी, मासळूकर कॉलनीत विकासकामांचा धडाका

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघातील नेहरुनगर, अजमेरा कॉलनी, मासळूकर कॉलनीत विकासकामांचा धडाका सुरु आहे. आमदार महेश लांडगे यांच्या विकास निधीतून विकासकामे केली जात आहेत.

अजमेरा कॉलोनीमधील अंतरिक्षा गृहनिर्माण सोसायटीत लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यात येत आहेत. आमदार महेश लांडगे यांच्या आमदार निधीतून खेळणी बसविण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे, आशा काळे यांच्यासह सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजमेरा, उद्यमनगर, यशवंतनगर, पिंपरी येथील भागातील रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक होत असते. कामगारांची वर्दळ नेहमीच असते. आजूबाजूला सोसायट्या आहेत. शाळेतील मुले रस्ता ओलांडताना अनेकदा अपघात घडले आहेत. त्यामुळे अपघात टाळण्याकरिता आणि वाहनांचा वेग कमी करण्याकरिता अजमेरा, उद्यमनगर भागातील रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकण्यात येणार आहेत. तसेच या परिसरात औषध फवारणी देखील केली जाणार आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.