Pimpri : सोहम सार्वजनिक ग्रंथालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा

एमपीसी न्यूज – ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कवी श्रेष्ठ श्री वि वा शिरवाडकर ( Pimpri)  यांचा जन्मदिवस म्हणजे मराठी राजभाषा दिन पिंपरीतील सोहम सार्वजनिक ग्रंथालयात मोठ्या उत्साहात साजरा कऱण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे हे होते .कार्यक्रमाचे अध्यक्ष सोहम अभ्यासिकेतून नुकतेच प्रशासकीय पदावर निवड झालेले सुजित पाटील हे होते.  याप्रसंगी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली.

Chinchwad : चिंचवडकरांना शुक्रवारी मिळणार सुमधूर गझलांची मेजवानी

सोहम सार्वजनिक ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविक केले .त्यात त्यांनी मराठी भाषा टिकवायची असेल तर  मोबाईल बाजूला ठेवून महिन्याला एक पुस्तक तरी वाचले पाहिजे ग्रंथालये ही तरली पाहिजेत. ग्रंथालय वर्धिष्णु संस्था असून संस्कार केंद्रे आहेत. मुळात आई-वडीलच पुस्तके वाचत नाहीत ;आई वडील पुस्तक वाचत असतील तर तेथे मुलांवर अवश्य वाचन संस्कार होतात. मुलेही वाचायला लागतात, असे विचार मांडले.

राजन लाखे यांनी मराठी भाषा व वी. वा. शिरवाडकर यांच्या विषयी विस्तृतपणे समर्पक अशी उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी सुजित पाटील , संदीप गायकवाड व महेश भोजगुडे या विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

प्रदीप बोरसे यांनी सूत्रसंचलन केले तर ग्रंथपाल वर्षा बोरसे यांनी आभार ( Pimpri)  मानले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.