Pimpri : शहर जुलूस कमिटीच्या वतीने शहरात मोहंम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर जुलूस कमिटीच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात मोहंम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहर जुलूस कमिटीच्या वतीने पिंपरी येथील लतिफिया मशिदीपासून अल्लाहची प्रार्थना करून मौलाना नसीबुल्ला अजीजी यांच्या हस्ते झेंडा दाखवून मिरवणूकचा प्रारंभ करण्यात आला. डिलक्स चौक, जमतानी चौक, गेलॉर्ड चौक, साई चौक, शगुन चौक, पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सांगता झाली. ठिकठिकाणी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून युवकांनी मिरवणूकीत सामील झालेल्या मुस्लिम बांधवांना पिण्याचे पाणी, पेयजल, सरबत आदींचे वाटप केले. पिंपरी-चिंचवड शहर जुलूस कमिटीचे अध्यक्ष याकुब खान, उपाध्यक्ष युसूफ कुरेशी, सचिव अकबर मुल्ला, सहसचिव हाजी गुलाम रसूल, खजिनदार मुश्ताक शेख, सहखजिनदार सलीम मेमन, माजी अध्यक्ष हबीब शेख, भाईजान काझी, पदाधिकारी अजहर खान, झिशान सय्यद, रमजानभाई अत्तार, जुम्मनभाई, मोईनभाई शेख, फैजअहमद दलाल, शकील सलमानी, इजाज खान, झाकीर शेख, सल्लागार गुलामअली भालदार आदींनी सहभाग घेतला.

पिंपरी-चिंचवड शहर जुलूस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागातून मिरवणूकीद्वारे पिंपरी येथे सर्व मिरवणूका दाखल झाल्या. त्यात 40 स्वयंसेवी मंडळांचा सहभाग होता तसेच शहरातील विविध मशीदी व मदरशातील 80 मौलानांचा मिरवणूक सहभाग होता. त्यासर्वांचा पिंपरी येथील सांगता कार्यक्रमात सत्कार करण्यात आला व दिल्ली येथील मौलाना व माजी खासदार उबेदूल्ला आझमी यांचे मोहंम्मद पैगंबर यांच्या जीवनावर प्रवचन झाले.

पिंपरी, काळेवाडी, पवनानगर, श्रीनगर, नढेनगर परिसरातून गुलशने गौसिया यंग सर्कल, हुसेनी यंग सर्कल, हुज्जतुल इस्लाम यंग बॉईज ग्रुप, इकरा यंग कमिटी कब्रस्तान, रजा यंग सर्कल, अंजुमने फैजाने निमाजी मदरसा, के.जी.एन.नवजवान यंग कमिटी, सुलताने हिंद नौजवान कमिटी, दारुल उलूम फैजाने रजा, शेरे खुदा यंग सर्कल, जमाते रजा-ए मुस्तफा, आशिकाने ताजुश्शारिया अ‍ॅके तर नेहरुनगर, लांडेवाडी, भोसरी, दिघी, संततुकाराम नगर, कासारवाडी परिसरातून बजमे फजले रसूल, हिलाल वेलफेअर कमिटी, सुलताने हिंद यंग कमिटी, डॉ. मौलाना अबूल कलाम ग्रुप, अंजुमने गुलशने मदिना मदरसा, निगाहे एकता यंग सर्कल, निगाहे करम एकता यंग सर्कल, जामिया यंग सर्कल, जामिया कमरअली दर्वेश, दारूल उलूम फैजाने मुस्तफा, मीम यंग बॉईज, राजस्थान मुस्लिम जमात यांनी मिरवणूक काढली होती.

तसेच चिखली, कुदळवाडी, पवार वस्ती, जाधववाडी, घरकुल परिसरातून गौसे आझम यंग सर्कल कमिटी, अलहुसेनी यंग सर्कल, फजले हक फाऊंडेशन, हिंद वेलफेअर सोसायटी, अंजुमने फैजाने मुस्तफा व चिंचवड, निगडी, आकुर्डी, प्राधिकरण, रुपीनगर, तळवडे, देहूरोड या परिसरातून आझाद गु्रप चिंचवड, जामिया गौसिया यंग सर्कल, अलमदिना यंग सर्कल, सलमानी यंग सर्कल, निगडी यंग सर्कल, अंजुमने फजले रसूल, नुरे गुलशने मदिना रजा यंग सर्कल, मदरसा कंजूल इमान, मदरसा गौसिया रिजविया, आबुशावली कलंदर दर्गा या परिसरातून दुचाकी, पायी, चारचाकी गाड्यातून मुस्लिम बांधव मोहंम्मद पैगंबराचा जयघोष करत पिंपरी येथे मिरवणूकीद्वारे एकत्र झाले.

पैगंबर हजरत मुहम्मद सल्ल्लाहू अलैही वसल्लम यांचा अरब देशातील पवित्र मक्का शरीफ या गावी कुरैश या कुटुंबात जन्म झाला. त्यांनी
मार्गदर्शन, उपदेश व आदेश करण्यापूर्वी सर्वप्रथम स्वतः आचरण करणे हा त्यांचा विशेष स्वभावगुण होता. मनमिळावू, सभ्यता, विनम्रता, प्रेमळ
स्वभाव, शत्रूंना माफ करणे, द्वेषभावना न बाळगणे आदी विशेष गुण त्यांच्यात होते. यांच्या या विचाराचे अनुकरण करण्यासाठी मुस्लिम बांधव
मोहंम्मद पैगंबर यांची जयंती साजरी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.