Pimpri news : भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाची दुचाकीला धडक एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या ( Pimpri news ) वाहनाने एका दुचाकीला समोरून धडक दिल्याने  झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा  मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना चाकण-शिक्रापूर रोडवर शुक्रवारी (दि. 17) मध्यरात्री एक वाजता घडली.

विशाल मंगेश सावके (वय 22) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गौरव हेमंत सारसकर (वय 25 , रा. बाणेर, पुणे) हे गंभीर जखमी झाले आहेत.  याप्रकरणी एमएच 12 /एलजे 6895 क्रमांकाच्या वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri News : वडगांव घेनंद मध्ये बेली महादेवाला भाविकांची गर्दी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव आणि त्यांचा मित्र विशाल हे दुचाकीवरून चाकण-शिक्रापूर रोडने जात होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगात आलेल्या वाहनाने गौरव ( Pimpri news ) यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात विशाल यांच्या डोक्यात गंभीर दुखापत होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर गौरव यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर वाहन चालक वाहन सोडून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.