Pimpri News : वडगांव घेनंद मध्ये बेली महादेवाला भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज – वडगांव घेनंद येथील डोंगराच्या कुशीत निसर्ग (Pimpri News) रम्य ठिकाणी असलेल्या पांडवकालीन बेली महादेवाच्या दर्शनासाठी आज (दि.18)  महाशिवरात्री निमित्त अनेक भाविकांनी गर्दी केली होती.

 

Wakad News: ‘रिदम’च्या मदतीला ‘अनमोल’चे सभासद; अतिक्रमणावर कारवाईसाठी PMRDA ला दिले निवेदन

भाविकांनी शिवपिंडीवर मनोभावे बेलपत्र व बेलाचे फळ अर्पण केले.उन्हापासून भाविकांचे संरक्षण व्हावे यासाठी दर्शन मंडपावर पांढऱ्या पडद्याचे आच्छादन बांधले होते.भाविकांसाठी खिचडी व केळी या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

 

तसेच भाविकांसाठीपाण्याची सुविधा ही करण्यात आली होती.यावेळी हे मंदिर सुंदर रित्या पुष्पांनी (Pimpri News) सजवले होते.मंदिरा लगत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.