Pimpri News : भामा आसखेड प्रकल्प! कार्यकारी अभियंत्याला हटविले, उपअभियंत्याकडे जबाबदारी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत (Pimpri News) भामा आसखेड धरणाजवळ जॅकवेल बांधावयाच्या निविदेत 30 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर प्रकरण उजेडात आले असताना आयुक्त शेखर सिंह यांनी अधिका-यांच्या जबाबदारीत बदल केला आहे. या प्रकल्पाचे कामकाज पाहणारे कार्यकारी अभियंता देवण्णा गट्टूवार यांना हटवून उपअभियंता दिपक पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपविली. त्यांना कार्यकारी अभियंतापदाचा अतिरिक्त पदभार दिला. या हालचालींवरुन आचारसंहिता संपताच आयुक्त भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन गाजलेला ‘जॅकवेल’चा प्रस्ताव मान्यतेसाठी आणतील असे दिसते.

पाणीपुरवठा विभागांतर्गत भामा आसखेड पाणी प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पाचे कामकाज कार्यकारी अभियंता देवण्णा गट्टुवार यांच्याकडे सोपविले होते. त्यांच्याकडे ग स्थापच्य विभागाचेही कामकाज सोपविले आहे. या प्रकल्पासाठी पूर्णवेळ काम करणे शक्य नसल्याने पाणीपुरववठा प्रकल्पाची गरज लक्षा घेता या प्रकल्पाचे कामकाज ग क्षेत्रीय पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता दीपक पाटील यांच्याकडे अतिरिक्त पदभाराद्वारे (Pimpri News) सोपविण्याचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी कळविले.

Wakad News: ‘रिदम’च्या मदतीला ‘अनमोल’चे सभासद; अतिक्रमणावर कारवाईसाठी PMRDA ला दिले निवेदन

भामा आसखेड प्रकल्पाच्या कामकाजाकरिता अधिका-यांची आवश्यकता विचारात घेता, प्रशासकीय कामकाजाच्या सोईच्या दृष्टीने उपअभियंता पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा (भामा आसखेड प्रकल्प) विभागाचे कार्यकारी अभियंता पदाचे कामकाज अतिरिक्त पदभाराद्वारे सोपविण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी आयुक्तांची मान्यता आणि विभागप्रमुखांची शिफारस विचारात घेत उपअभियंता पाटील यांच्याकडे भामा आसखेड प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार दिला. पाटील यांनी मूळ विभागाचे कामकाज सांभाळून कार्यकारी अभियंता पदाचे अतिरिक्त कामकाज करावयाचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.