Wakad News: रिदम’ सोसायटी पाठोपाठ ‘अनमोल’ रेसिडन्सीची बेकायदेशीर झोपड्यांवर कारवाईची PMRDA कडे मागणी

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या वाकड (Wakad News) येथील सर्व्हे क्रमांक 210, 208, 209 येथील मोकळ्या भूखंडावर वसलेल्या बेकायदेशीर झोपडीधारकांवर कारवाईच्या रिदम हाऊसिंग सोसायटीच्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी कस्पटे वस्ती येथील अनमोल रेसिडन्सी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे 1 हजार रहिवाशी पुढे आले आहेत. सोसायटीच्या शेजारील पीएमआरडीएच्या भूखंडावरील अनधिकृत वसाहतीमुळे आरोग्यास धोका निर्माण झाला असून या झोपड्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत पीएमआरडीचे आयुक्त राहुल महिवाल यांना निवेदन दिले आहे. अनमोल रेसिडन्सी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने निवेदनात म्हटले आहे की, सोसायटी लगत असलेल्या पीएमआरडीएच्या वाकड येथील सर्व्हे क्रमांक 210, 208, 209 येथील मोकळ्या भुखंडाची देखभाल, विकसित केला जात नाही. अनेक वर्षांपासून हा भूखंड अतिक्रमणासाठी वापरला जात आहे.

या खुल्या जमिनीवर अत्यंत अस्वच्छ, असुरक्षित परिस्थिती निर्माण झाली आहे. या जागेवर बेकायदेशीर झोपड्या वसल्या आहेत. स्वच्छता राखली जात नाही. कचरा नाल्यांमध्ये आणि उघड्या खड्यांमध्ये टाकला जात आहे. यामुळे सोसायटीमधील रहिवाशांच्या आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात.

बेकायदेशीरपणे डुकरांची पैदास आणि इतर बेकायदेशीर कृत्ये देखील चालतात. त्याकडे दुर्लक्ष केले जात (Wakad News) आहे. गुन्हेगारी वाढत आहे. रात्री आग लावली जाते. स्मार्ट वाकड असे फलक असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी वाकडला आदर्श म्हणून प्रक्षेपित केले जात असताना पीएमआरडीएच्या मोकळ्या भूखंडावरील अस्वच्छता, असुरक्षितता हा विरोधाभास आहे. या भागात चांगल्या आणि पायाभूत सुविधा आहे.

Talegaon Dabhade : विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे रक्षण म्हणजे राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण

या विश्वासाने देशभरातील लोकांनी उपनगरांना आपले घर बनवले. पण, दुर्दैवाने उघड्यावर शौचास जाणे, बेकायदेशीर झोपड्या, अतिक्रमणे, डुकरांचे प्रजनन स्थळ या सारख्या प्रमुख समस्यांचे निराकरण होत नाही. त्यामुळे वाकड, पिंपरी-चिंचवड बद्दल देशभर चुकीचा संदेश जातो. या खुल्या प्लॉटला सीमाभिंत बांधावी. झोपडीधारकांना हटवावे. मोकळ्या भूखंडावर मंजूर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी सक्रिया पावले उचलावीत अशी मागणीही त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.