Pimpri News : भारत जोडो यात्रेला मिळालेल्या प्रतिसादामुळे राहुल गांधी यांच्यावर कारवाई – प्रणिती शिंदे

एमपीसी न्यूज – भारताची जनता 100 टक्के सेक्युलर आहे. देशाची ओळख नेहरू-गांधी यांच्यामुळे आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकशाही टिकविण्यासाठी, भाजपच्या (Pimpri News) मुस्कटदाबी विरोधात काढलेल्या भारत जोडो यात्रेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच यात्रा संपल्यानंतर काहीही करून गांधी यांच्यावर कारवाई केली जाणार होती. न्यायालयाच्या निकालाला 30 दिवसांची स्थगिती असतानाही तातडीने गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचा आरोप काँग्रेस  आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.

 

Bhosari : वडमुखवाडी येथील श्री साईबाबा मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष कैलास कदम, महिला अध्यक्षा सायली नढे, माजी महापौर कविचंद भाट आदी उपस्थित होते.

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, काँग्रेस लोकशाही, देश वाचविण्यासाठी लढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितीही प्रयत्न केले. तरी येणा-या अनेक वर्ष भारत हा देश जगात नेहरु-गांधी यांचा देश म्हणूनच ओळखला जाणार आहे. कुणीही ते नाव पुसू शकत नाही. भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यात्रा संपल्यानंतर भाजपने ‘गेम प्लॅन’ करुन राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली.

लोकशाहीची हत्या, मुस्कटदाबी, गळचेपी केली जात आहे. भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. लोकशाहीत बोलू दिले जात नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी महिला विरोधी आहे.  प्रत्येकाची वेगवेगळी विचारसरणी असते. काँग्रेसचीही वेगळी विचारसरणी आहे. प्रत्येकाच्या (Pimpri News) विचारसरणीचा आदर करणे आवश्यक आहे. महाविकास आघाडी चर्चा करुन एकत्र निवडणूक लढविणार आणि महाराष्ट्राला स्थिर सरकार देणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.