Pimpri News : भरधाव दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार, तर सहप्रवासी जखमी

एमपीसी न्यूज  – स्पोर्ट बाईकवरून भरधाव वेगात जात असताना दुचाकीचा अपघात झाला. यात चालकाचा मृत्यू झाला असून दुचाकीवरील सहप्रवासी गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी (दि.1) दिघी पोलीस ठाण्यासमोरील उड्डाणपुलावर(Pimpri News) पुणे-आळंदी रोडवर घडला.

आशिष पुरणलाल केळकर (वय 30, रा. चऱ्होली बुद्रुक) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर बसवराज पतन शेट्टी (वय 28) असे गंभीर जखमी झालेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश कळंके यांनी दिघी पोलीस ठाण्यात (Pimpri News) फिर्याद दिली आहे.

Chinchwad Crime : वीजबिल अपडेट करण्याच्या बहाण्याने घातला 90 हजार रुपयांचा गंडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष आणि त्यांचा मित्र बसवराज हे रविवारी मध्यरात्री पावणे एक वाजता पुणे-आळंदी रोडने केटीएम बाईकवरून भरधाव वेगात जात होते. दिघी पोलीस ठाण्यासमोरील उड्डाणपुलावरून जात असताना आशिष याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीचा अपघात झाला. त्यात आशिषचा मृत्यू झाला. तर मागे बसलेला बसवराज हा गंभीर जखमी झाला आहे. दिघी पोलीस (Pimpri News) तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.