Mahavitaran : शासकीय वीज कंपन्यांच्या सर्व कर्मचारी संघटनांबरोबर संपाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार उद्या मुंबईत चर्चा

एमपीसी न्यूज- शासकीय वीज कंपन्यांच्या सर्व कर्मचारी संघटनांबरोबर संपाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (4 जानेवारी) मुंबईत चर्चा करणार( Mahavitaran) आहेत.
महावितरण महानिर्मिती व महापारेषण या शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या अभियंता तंत्रज्ञ कर्मचारी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवार 4 जानेवारीच्या शून्य तासांपासून 6 जानेवारीपर्यंत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. संपात सहभागी असलेल्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या 4 जानेवारी 2023 रोजी दुपारी एक वाजता सह्याद्री अतिथी गृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपला प्रस्तावित संप मागे घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे, अशी माहिती महावितरणाकडून (Mahavitaran) देण्यात आली.

ग्राहकांना अखंडित पुरवठा मिळावा यासाठी महावितरण संपूर्ण काळजी घेत असून याउपरही वीज पुरवठा खंडित (Mahavitaran) झाल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्रमांक 1800-212-3435/ 1800-233-3435/ 1912/ 19120 यावर संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.