Pimpri Crime News: प्राधिकरणाच्या भूखंडाची विक्री करणारा भाजप नगरसेवक पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण करत जागेची विक्री केल्याप्रकरणी महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरु असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे भोसरी पोलिसांनी सांगितले.

शहर सुधारणा समितीचे सभापतीपद, स्थायी समितीचे सदस्यत्व या नगरसेवकाने भूषविले आहे. या नगरसेवकाने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण केले. जागा प्राधिकरणाच्या नावाने असताना आपली जागा असल्याचे दाखवून जागेची विक्री केल्याची तक्रार आहे.

तसेच या नगरसेवकाने पॉवर ऑफ अटर्नी, ताबा पावती केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार भोसरी पोलिसांनी या नगरसेवकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. याबाबत प्राधिकरण प्रशासन तक्रार देणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.