Chinchwad News: क्रांतीवीर चापेकर स्मारकाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामासाठी तीन कोटी; ‘स्थायी’ची मान्यता

एमपीसी न्यूज – चिंचवडगावातील क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारकाच्या तिस-या टप्‍प्याचे कामे करण्यासाठी येणा-या 3 कोटी 19 लाख इतक्या खर्चासह महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या झालेल्या आणि येणा-या सुमारे 84 कोटी 26 लाख रुपये खर्चास स्थायी समिती सभेने आज (गुरुवारी) मान्यता दिली.

महानगरपालिकेचे डेटा सेंटर मधील सर्व्हर, नेटवर्क स्वीचेस, टेप लायब्ररी, स्टोरोज यांची वॉरंटी एक वर्षे कालावधीसाठी वाढविणे व फायरवॉल अपग्रेड करणेकामी येणा-या 1 कोटी 16 लाख, रूपीनगर येथील ठाकरे शाळा आणि खेळाचे मैदानाची देखभाल दुरूस्ती करण्याकामी येणा-या 26 लाख 72 हजार, विभागाकडील प्रभाग क्रमांक 11 मधील मैलाशुद्धीकरण केंद्रास सिमाभिंत बांधणे व इतर कामे करणेकामी येणा-या 98 लाख 43 हजार, त्रिवेणीनगर परिसातील रस्त्यांचे डांबरीकरण करणेकामी येणा-या 45 लाख, गणेशनगर परिसरातील रस्त्याचे खडीमुरूमीकरण व डांबरीकरण करणेकामी येणा-या 54 लाख 58 हजार रुपये तसेच प्रभाग क्र. 11 मध्ये विविध ठिकाणी पेव्हींग ब्लाँक बसविणे व इतर स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणा-या 60 लाख रुपयांच्या कामाला मान्यता देण्यात आली.

वाकड येथील सदगुरु कॉलनी, चौधरीपार्क, स्वामी विवेकानंदनगर व प्रभागातील इतर परिसरातील फुटपाथ, पेव्ह‍िंग ब्लॉकच्या दुरुस्तीची कामे करणेकामी येणा-या 27 लाख 94 हजार, प्रभाग क्र.6 मध्ये मोहननगर, सदगुरूनगर, लांडगेवस्ती, महादेव नगर, मधुबन सोसायटी व परिसरामध्ये रस्त्यांची खडीकरण व बीबीएम पध्दतीने सुधारणा करणेकामी येणा-या 51 लाख 89 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

चिंचवड मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.10 मधील झोपडपट्टी परिसरात जलनि:सारण विषयक सुधारणा कामे करणे व उर्वरित ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकणेकामी येणा-या 33 लाख 77 हजार, प्रभाग क्र.19 मधील भाटनगर, भीमनगर, निराधारनगर व इतर परिसरात जलनि:सारण विषयक सुधारणा कामे करणे व उर्वरित ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकणेकामी 28 लाख 88 हजार तर प्रभाग क्र.19 मधील श्रीधरनगर, दत्त मंदिर व इतर परिसरात जलनि:सारण विषयक सुधारणा कामे करणे व उर्वरित ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकणेकामी येणा-या 28 लाख 54 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

वाकड येथील कलाटे पार्क व इतर परिसरातील डी.पी. रस्ते अद्ययावत पध्दतीने विकसीत करणेकामी येणा-या 17 कोटी 62 लाख इतक्या खर्चास स्थायी समिती सभेकडून मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.