Talegaon News : तळेगाव नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने पवना हॉस्पिटलला व पायोनियर हॉस्पिटल यांना व्हेंटिलेटर भेट

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील तळेगाव नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्या स्मरणार्थ तळेगाव नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने पवना हॉस्पिटलला 2 व पायोनियर हॉस्पिटल यांना 2 बायपॅक (व्हेंटिलेटर) भेट देण्यात आले.

त्याच बरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचालित नथूभाऊ भेगडे कोव्हिड सेंटरला रुपये 25 हजारचा धनादेश भेट देण्यात आला*

याप्रसंगी पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, पतसंस्थेचे अध्यक्ष अंकल तथा अशोक भेगडे, तळेगाव शहर भाजपचे अध्यक्ष रवींद्र माने, पतसंस्थेचे प्रवर्तक इंद्रकुमार ओसवाल, माजी अध्यक्ष प्रकाश ओसवाल कै. सुनील गायकवाड यांचे चिरंजीव सत्यसेन गायकवाड सर्व संचालक मंडळ पवना हॉस्पिटल व पायोनियर हॉस्पिटलचे डॉक्टर व सर्व अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.