Pimpri News: अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवरील कारवाईसाठी एक कोटींचा खर्च

स्थायी समितीच्या बैठकीत खर्चाला मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ‘अ’,’ब’,’क’,’ड’,’ई’,’फ’,’ग’ आणि ‘ह’ या क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असणा-या अनधिकृत बांधकामांवर आणि अतिक्रमणांवर कारवाई करण्याकामी विविध प्रकारची यंत्रसामुग्री पुरविण्यास 1 कोटी 88 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. या खर्चाला आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक 16 मधील रावेत आणि किवळे भागातील स्मशानभुमी मधील दुरुस्ती व स्थापत्य विषयक कामे करण्याकामी 27 लाख रुपये खर्च होणार आहेत.

प्रभाग क्रमांक 20 मधील कासारवाडी, कुंदननगर, विशाल थिएटर परिसर, वल्लभनगर, लांडेवाडी आणि उर्वरीत परिसरात वार्षिक ठेकेदारी पध्दतीने मलनि:सारण लाईन आणि चेंबरची देखभाल दुरुस्ती करण्याकामी 29 लाख रुपये खर्च होणार आहेत.

चिंचवड मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्रमांक 10 मधील विद्यानगर, दत्तनगर व इतर परिसरात जलनि:सारण विषयक सुधारणा करणे. उर्वरीत ठिकाणी जलनि:सारण विषयक कामे करण्याकामी 32 लाख रुपये खर्च होणार आहेत.

क्रमांक 18 मधील महापालिका शाळा इमारतीची देखभाल दुरुस्ती करण्याकामी 27 लाख रुपये खर्च होणार आहेत.

क्रांतिवीर चापेकर वाड्याच्या तिस-या टप्प्याची प्रस्तावात नमूद कामे करण्याबाबत महापालिका आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या समवेत करावयाच्या 5 कोटी 75 लाख अधिक जीएसटीच्या करारनाम्यासाठी 15 टक्के म्हणजेच 86 लाख रुपये आगाऊ स्वरुपात बँक गॅरेंटीसाठी देण्यास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक 13 सेक्टर क्रमांक 22 मधील जुन्या मधुकर पवळे शाळा इमारतीचे रेट्रोफिंटींग पध्दतीने मजबुतीकरण करण्याकामी 27 लाख रुपये खर्च होणार आहेत. प्रभाग क्रमांक 8 मधील उद्यानांमध्ये विद्युत विषयक नुतनीकरणाची कामे करण्याकामी 42 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

प्रभाग क्रमांक 2 येथील रस्ते सुशोभिकरण अंतर्गत विद्युत विषयक काम करण्यासाठी 38 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत

प्रभाग क्रमांक 11 मधील कुदळवाडी शाळा इमारतीची स्थापत्य विषयक सुशोभिकरण कामे करण्यासाठी 42 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. काळेवाडी फाटा ते देहू आळंदी, नाशिक फाटा ते वाकड या रस्त्यावर सेवा वाहिन्यांचे चरांची दुरुस्ती करण्यासाठी एकूण 1 कोटी 83 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

प्रभाग क्रमांक 12 रूपीनगर ते धनगरबाबा मंदीरापर्यंतच्या नाल्याची दुरुस्ती करून उर्वरीत नाला ट्रेनिंग करण्यासाठी 57 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

प्रभाग क्रमांक 15, प्रभाग क्रमांक 19 आणि प्रभाग क्रमांक 14 मध्ये आवश्यकतेनुसार जलनि:सारण नलिका सुधारणा विषयक कामे आणि मलनि:सारण नलिका देखभाल दुरुस्तीसाठी 85 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या प्रस्तावांना स्थायी समितीने मान्यता दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.