Pimpri News: संगणक वर्क स्टेशन खरेदी करण्यासाठी 26 लाखाचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी आणि माहिती व तंत्रज्ञान विभागासाठी 20 नग संगणक वर्क स्टेशन खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी 26 लाख रुपयांचा खर्च येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

संगणक वर्क स्टेशन खरेदी करण्यास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 27 जून 2020 रोजी मान्यता दिली आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या गव्हर्मेंट ई-मार्केटप्लसवर निविदा मागविण्यात आल्या. 36 लाख रूपये निविदा दर ठरविण्यात आला. त्यामध्ये सांगली येथील विट्रॅग कॉम्प्युटर्स यांनी प्रति नग 1 लाख 32 हजार 900 रूपये याप्रमाणे 26 लाख 58 हजार रुपये हा लघुत्तम दर सादर केला.

त्यानुसार, ही निविदा स्विकृत करण्यात आली. विट्रॅग कॉम्प्युटर्स यांनी सादर केलेल्या दरानुसार करारनामा करून संगणक वर्क स्टेशन खरेदी करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.