Pimpri news: ‘रेमडिसेविर’ चा तुटवडा जाणून देवू नका; उपमहापौरांच्या प्रशासनाला सूचना

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबर गंभीर, अतिगंभीर रुग्णांचीही संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे या रुग्णांना उपयुक्त ठरत असलेल्या रेमडिसेविर इंजेक्शनचा तुटवडा जाणून देवू नका, इंजेक्शन अभावी कोणाचा जीव जाता कामा नये. महापालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सर्वांना इंजेक्शन मोफत द्यावे. इंजेक्शनचा पुरेसा साठा ठेवा. त्याचा काळा बाजार होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना उपमहापौर हिराबाई घुले यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात उपमहापौर घुले यांनी म्हटले आहे की, शहरात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये भयानक वाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता हा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याचे दिसून येत आहे.

वाढत्या रुग्णसंख्येत गंभीर, अतिगंभीर रुग्णांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या रुग्णांना रेमडिसेविर इंजेक्शन उपयुक्त ठरत आहे.

_MPC_DIR_MPU_II

शहरातील सामान्य नागरिकांना बाजारातील रेमडिसेविर इंजेक्शनचे दर परवडणारे नाहीत. त्यामुळे सत्ताधारी भाजपने महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांना रेमडिसेविर इंजेक्शन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार महापालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाला मोफत इंजेक्शन मिळाले पाहिजे. सध्या रेमडिसेविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमडिसेविरचा तुटवडा जाणवू देऊ नका, त्याचा पुरेसा साठा ठेवण्यात यावा.

रेमडिसेविर इंजेक्शनअभावी कोणाचा बळी जाता कामा नये. याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी. त्याची तक्रार येऊ देऊ नका, रेमडिसेविर इंजेक्शनचा काळा बाजार होऊ देऊ नका, त्यावर महापालिकेने अंकुश ठेवावा, अशा सूचनाही उपमहापौर घुले यांनी केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment