Pimpri News : कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय, मात्र पालिका रुग्णालयांत उपलब्ध नाही कोविड लस

एमपीसी न्यूज – जगभरात तसेच भारतात कोविड पुन्हा डोक वर काढत असताना पिंपरी- चिंचवड महापालिका रुग्णालयातील कोविड प्रतिबंधक लस मात्र संपुष्टात आली आहे.(Pimpri News) तसे फलक ही आता रुग्णालय परिसरात लावलेले दिसत आहेत.

सरकार लसीकरण पूर्ण करा अशी जनजागृती करत असताना प्रशासनाकडे लस नसेल तर नागरिकांनी लसीकरण घ्यायचे कुठे असा सवाल उपस्थित होत आहे.

Pimpri News : भारत 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचा संकल्प : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

या विषयी बोलताना माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोणत्याही दवाखान्यात सध्या कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध नाही.(Pimpri News) महापालिकेने आधी कोविडची लस नागरिकांना उपलब्ध करून द्यावी. त्यानंतरच मास्क सक्ती सारखी उपाययोजना करावी. केंद्र शासनाने व राज्य शासनाने ‘लॉक डाऊन’ सारखे कुचकामी ठरलेले उपाय करून सर्वसामान्यांचे जगणे अवघड करून टाकू नये, ही कळकळीची विनंती आहे.

तर महापालिका प्रशासनाच्या वतीने बोलताना आरोग्य वैद्यकीय अधिकारी पवन साळवी म्हणाले की, लसीकरण सुरू होते मात्र सध्या लास संपली असून राज्य शासनाकडून पुढचा लसीचा पुरवठा झालेला नाही, जसा पुढचा लॉट येईल तसे लसीकरण सुरू होईल. त्यामुळे नागरिकांनीच स्वतः काळजी घेत परिसरात वावरणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.