Pimpri News : चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना

एमपीसी न्यूज – अमृत अभियानाअंतर्गत दुसर्‍या टप्प्यात शहरातील 24 तास पाणीपुरवठा प्रकल्पाचे नियोजन आणि योग्य रित्या अंमलबजावणी करण्यासाठी शहरस्तरीय टास्क फोर्स स्थापन (Pimpri News)करण्यात आले आहे. पाणीपुरवठा शहर अभियंत्याच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या टास्क फोर्सची कार्यकक्षा आणि त्यांचे अधिकार व कर्तव्येही ठरविण्यात आली आहेत.

केंद्र सरकार पुरस्कृत अमृत अभियानाअंतर्गत दुसर्‍या टप्प्याची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. सर्व शहरातील घरांना नळ जोडणी देऊन पाणीपुरवठ्याच्या बाबतीत 100 टक्के स्वंयपूर्ण करणे हे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये आहे. केंद्र सरकारच्या 10 मे 2022 रोजीच्या पत्रानुसार अमृत अभियानाअंतर्गत 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी राज्यस्तरीय कार्यदल (टास्क फोर्स) स्थापन करण्याबाबत सुचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, राज्याच्या नगर विकास विभागाने 5 जानेवारी 2023 रोजी राज्यस्तरीय आणि शहरस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यस्तरीय आणि शहरस्तरीय टास्क फोर्सची कार्यकक्षा आणि त्यांचे अधिकार व कर्तव्येही ठरविण्यात आली आहेत.

Pune Crime News : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या गेटवरूनच तोतया पोलिसाला अटक

शहरातील 24 तास पाणीपुरवठा प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी शहरस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहे. प्रत्येक शहर स्तरावर सिटी लेव्हल टास्क फोर्स स्थापन करणे आवश्यक असून त्याची रचनाही ठरविण्यात आली आहे. त्यानुसार, शहरस्तरीय टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी पाणीपुरवठ्याशी संबंधित शहर अभियंता राहणार असून सदस्यपदी राज्य मंडळाचे कार्यकारी अभियंता, राज्य भूजल विभागातील वरिष्ठ भूवैज्ञानिक, स्थानिक अभियांत्रीकी महाविद्यालयातील पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक, जीआयएस एक्सपर्ट किंवा हायड्रोलिक मॉडेलींग तज्ञ, इलेक्ट्रीकल किंवा मॅकेनिकल अभियंता तथा स्काडा तज्ञ, शहर स्तरावरील पीपीपी तज्ञ, शहर पातळीवरील एनजीओ आदींचा समावेश असणार आहे. तर, फोर्सच्या सदस्य सचिव आणि समन्वयकपदी सीटीएफ अध्यक्षांच्या कार्यालयातील उपअभियंता राहणार (Pimpri News)आहे.

पाणीपुरवठा नेटवर्कचा डिजीटल नकाशा तयार करा

शहरस्तरीय टास्क फोर्सचे अध्यक्ष हे सरकारी किंवा निमसरकारी संस्थेच्या सदस्याला विशेष निमंत्रक म्हणून निमंत्रित किंवा स्विकृत करू शकतील. सीटीएफ द्वारे शहरातील 24 तास पाणीपुरवठा योजनेत काम करणार्‍या अभियंता आणि त्यांच्या कर्मचार्‍यांकरिता प्रशिक्षण आयोजित करावे. 24 तास पाणीपुरवठ्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणे, जीआयएस आधारीत सर्वेक्षण, पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे डिझाईन करणे, योजनेचे सर्व काम पूर्ण होईपर्यंत कामाचे निरीक्षण करण्याची जबाबदारी व कर्तव्य सल्लागाराचे असणार आहे. शहरातील पाणी पुरवठ्यासंबंधी ऑपरेशनल झोनसाठी पाणीपुरवठा पायाभूत सुविधांचे जीआयएस मॅपिंग करणे, पायाभtत सुविधांचे नकाशे त्यांच्याकडे उपलब्ध असल्याची खात्री करणे, पाणीपुरवठा नेटवर्कचा योग्य डिजीटल नकाशा तयार करून ठेवणे, याकडे टास्क फोर्सने लक्ष ठेवावे.

95 टक्के बारमाही शाश्वत जलस्त्रोत ठेवा

शहरात 95 टक्के बारमाही शाश्वत जलस्त्रोत असल्याची खात्री करावी. पाणीपुरवठा वितरण प्रणालीसाठी प्रत्येक सेवा जलाशय किंवा पंपिंग स्टेशनसाठी एक ऑपरेशनल झोन ठेवावेत. सर्व प्रस्तावित जिल्हा मीटर क्षेत्र हायड्रॉलिकली वेगळ्या असाव्यात. जलाशय रिकामे होणार नाहीत किंवा ओव्हरफ्लो होणार नाहीत अशा प्रकारे ऑपरेशनल झोनची सीमा सेवा निश्चित करावी. ग्राहक 100 टक्के मीटरींग आहे का, प्रत्येक मीटरला जीआयएसटॅग केले आहे का, सर्व बल्क मीटर स्काडा प्रणालीशी जोडलेले आहेत का याची खात्री करावी. व्यावसायिक, औद्योगिक आणि उंच इमारतींच्या सोसायटीसाठी, स्वंयचलीत रिडींग मीटरचे नियोजन(Pimpri News) करावे.

ग्राहक तक्रार निवारण कक्ष स्थापन करा
जेथे शक्य असेल तेथे ब्रेक प्रेशर टाकीचे नियोजन करावे. बीपीटीचे इनलेट आणि आऊटलेट समान पातळीवर ठेवले पाहिजेत. आवश्यक प्रमाणात पाणी उच्च पातळीवर पंप केले जाईल आणि उर्जेचा खर्च अनुकूल होईल यासाठी उच्च पातळीच्या क्षेत्रांना पाणीपुरवठा करणारे जलाशय वेगळे केले जावेत. ग्राहक तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात यावा. प्रत्येक शहरासाठी आपत्कालीन व्यवस्थापन प्रणाली स्थापन करावी. प्रत्येक शहराने नॉन – रेव्हेन्यू वॉटर सेल स्थापन केला आहे का, याची खात्री करावी. शहरस्तरीय टास्क फोर्सचा कालावधी सुरूवातीला सन 2022 ते 2024 असा तीन वर्षे असेल आणि अमृत अभियानाच्या दुसर्‍या टप्प्याचा कालावधी पूर्ण होईपर्यंत(Pimpri News)वाढवला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.