Pimpri News : गुरू दत्तात्रेय सेवा ट्रस्टच्या संयुक्त सचिवपदी गर्ग, खजिनदारपदी अग्रवाल

एमपीसीन्यूज : संपूर्ण भारतात सेवाभावी कार्यात अग्रेसर असलेलया श्री गुरू दत्तात्रेय सेवा ट्रस्टच्या महाराष्ट्र राज्य संयुक्त सचिवपदी विकास गर्ग, तर खजिनदारपदी अधिक अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशकुमार वर्मा यांनी गर्ग आणि अग्रवाल यांना नियुक्ती पत्र दिले आहे. गुरू दत्तात्रेय सेवा ट्रस्टच्या माध्यमातून विधवा महिला, अनाथ व दिव्यांग व्यक्ती आणि मुलांसाठी तसेच महिला सशक्तीकरणाचे कार्य केले जाते.

या ट्रस्टच्या माध्यमातून आगामी काळात पिंपरी चिंचवड शहरातील अनाथ मुले, दिव्यांग व्यक्ती आणि विधवा महिलांच्या सशक्तीकरणासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती गर्ग आणि अग्रवाल यांनी निवडीनंतर दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.