Pimpri News:  वासंतिक संगीत शिबिरात शास्रीय गायन, तबला, हार्मोनिअम वादनाबाबत  मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या संगीत अकादमीच्या वतीने  आयोजित केलेल्या वासंतिक शिबिरात शास्रीय गायन, तबला वादन, हार्मोनिअम वादन, सुगम संगीत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन पंडित अरविंद कुमार आझाद यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी क्रीडा पर्यवेक्षक अशोक पटेकर, मनिष जगताप, मिलिंद दलाल, विनोद सुतार, वैजयंती भालेराव, स्मिता देशमुख, वैशाली जाधव, संतोष साळवे, राजेश चावरिया आदी उपस्थित होते.

पंडित अरविंदकुमार आझाद यांच्या ‘तबला वादनाच्या कार्यशाळेत तबलावादन या विषयातील तीन तालातील कायदा ‘वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कसा वाजतो. तसेच साथ संगतीच्या दृष्टीने माहिती देऊन तबल्यातील विविध घराण्यांच्या तबला वादनातील बारकावे उपस्थितांना विषद केले. त्याचप्रमाणे बनारस घराण्यातील दुर्मिळ बंदीशीचे सादरीकरण करून प्रात्यक्षिक सादर करुन सर्वांची मने जिंकली.

या वासंतिक शिबीरामध्ये  शास्त्रीय संगीत, तबला,  हार्मोनियम तसेच सुगम संगीत या विषयांचे तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. सूत्रसंचालन समीर सूर्यवंशी यांनी केले. याप्रसंगी लहरासाथ उमेश पुरोहित यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.