Pimpri News : उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा : प्रतीक्षा घुले

एमपीसीन्यूज : उत्तर प्रदेशात हाथरस येथे दलित मुलीवर झालेला सामूहिक बलात्काराच्या घटनेने तेथील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देऊन उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी युवती सेना पिंपरी विधानसभा अधिकारी प्रतीक्षा घुले यांनी केली.

हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ युवा सेना आणि युवती सेना यांच्यावतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन केले. तसेच पीडित मुलीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोक सभा घेण्यात आली. त्यावेळी घुले यांनी उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारचा निषेध केला.

मोदी सरकारची “बेटी बचाव” ही घोषणा नसून भाजपशासित राज्यातील मायभगिनींसाठी चेतावणी आहे का ? असा सवाल युवा सेना अधिकारी निलेश हाके यांनी यावेळी उपस्थित केला.

शिवसेना महिला आघाडीच्या विभाग संघटक मनिषा परांडे यांनी स्रियांवररील अत्याचार रोखले गेले नाहीत तर तिव्र आंदोलन करु, असा इशारा दिला.

यावेळी विधानसभा अधिकारी सागर शिंदे, विभाग संघटिका शिल्पा अनपन, दिपा जगदाळे, गोपाळ मोरे, महेश बोधले,वर्षा घुले व अनेक युवासैनिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.